शा. शि. दाभाडे. अनु. जा. ज भ. विमुक्त शिक्षण संस्था संचलित देवघर सेवा धाम आश्रम शाळा,शाहूवाडी.

Personal Info

Terms

Donation Total: ₹100.00

बातम्या आणि माहिती

शाहूवाडीतील आश्रमशाळेत धान्य वाटप

आंबा, ता. २४ उमेद फौंडेशनच्यावतीने शाहूवाडीतील निवासी आश्रमशाळेत धान्य वाटप करण्यात आले. या वेळी शाहूवाडी पोलिस ठाण्याचे फौजदार श्रीराम पडवळे म्हणाले, “उमेद फौंडेशनने वंचित मुलांसाठी मूठभर धान्य गोळा करून वाटप करण्याचा राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे.” आश्रमशाळेचे संस्थापक बाबासाहेब मिसाळ, प्रा. रमेश चौगुले, संतोष कुंभार, श्रीमंत लष्कर, अमोल जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.

उमेद फौंडेशनचे प्रकाश गाताडे, रावसाहेब शिंदे, मिलिंद पाटील, बी. डी. पाटील, आर. बी. मोळके, डॉ. झुंझार माने, एस. टी. गवळी, बी. आर. चरणकर, राहुल कदम, विश्वास माने यांच्यासह स्वयंसेवक उपस्थित होते. दरम्यान, पदवीधर शिक्षक महादेव कुंभार (आळतूर) यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय उभारण्यासंदर्भात केलेल्या आवाहनाला फौंडेशनने प्रतिसाद दिला.