शाहूवाडी येतील अनाथ निराधार वंचित घटकातील मुलाच्या साठी 4. सायकली भेट


शाहूवाडी येतील अनाथ निराधार वंचित घटकातील मुलाच्या साठी पेरिड गावचे भाग्य विधाते या संस्थेचे सल्लागार, हितचितक मार्गदर्शक सन्मानिय श्री बाबुराव सागावकर साहेब (मालक,प्रणित इजिनियरींग वर्कस पुणे) याच्या वतीने 4. सायकली सदगुरू श्री वासुदेव गरड महाराज इदुरी (देवू)पुणे याच्या स्मरणार्थ देऊन उपकृत केल्याबद्दल मनापासून धन्यवाद तसेच लायन्स क्लब आकुर्डी पुणे याच्या वतीने 42 मुलांना गणवेश देऊन आपली लायन्स क्लब एक समाजाचा घटक आहे समाजाचे देणं लागतो या उदांत भावनेतून या मुलांना गणवेश देऊन उपकृत केल्याबद्दल मनापासून धन्यवाद*या प्रसंगी सागावकर साहेब बोलतांना म्हणाले की सद्गुरु वासुदेव महाराज यांच्या आदेशाने आपण या आश्रम शाळेला मदत करत आहोत सर्व मुलांना सायकल मिळेपर्यंत माझे असेच सत्कार्य राहील असे ग्वाही दिली तसेच लायन्स क्लब चे प्रेसिडेंट विक्रम माने साहेब, बोलतांना म्हणाले की या मुलाचे आरोग्य तपासणी व मदतीसाठी आमचे लायन्स क्लब मदत करणार आहे लायन्स क्लब चे मा.अध्यक्ष श्री गवई साहेब, बोलतांना आश्रम शाळेला मदतीचा हात देणार ही संस्था उर्जित अवस्थेत आण्यासाठी प्रयत्न करू या प्रसंगी श्री डॉ झुजार माने साहेब शिवप्रतिष्ठान श्री नाथा पाटील प्रभाकर माळी शशिकांत गवळी उपस्थित होते आभार दिपक बुचडे सरानी केले.*