शा. शि. दाभाडे. अनु. जा. ज भ. विमुक्त शिक्षण संस्था संचलित देवघर सेवा धाम आश्रम शाळा,शाहूवाडी.

Personal Info

Terms

Donation Total: ₹100.00

बातम्या आणि माहिती

शाहूवाडीत अनाथांसोबत रंगली अनोखी होळी

त्यांच्या जीवनात आनंदाचे रंग; सांगावच्या युवकांनी जपली ११ वर्षांची परंपरा

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा

शाहूवाडी येथील देवघर सेवाधाम आश्रमात यंदा होळीचा सण एका विशेष आणि हृदयस्पर्शी पद्धतीने साजरा करण्यात आला. सांगावच्या युवकांनी मागील ११ वर्षांपासून सुरू असलेली परंपरा कायम ठेवत, यावर्षीही अनाथ, निराधार आणि वंचित मुलांसोबत होळीचा आनंद द्विगुणित केला.

आश्रमातील ४२ निरागस मुलांसोबत युवकांनी पारंपरिक पद्धतीने होळी पेटवून, एकमेकांना रंग लावून जल्लोष केला. या मुलांसाठी खास मेजवानी म्हणून पोळी-पुरण जेवणाचा बेत आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, ‘हर घरकी पोळी’ या उपक्रमांतर्गत सांगाव गावातील प्रत्येक घरातून ६०० हून अधिक पोळ्यांचे योगदान मिळाले, ज्यामुळे या मेजवानीला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले. देवघर सेवाधाम आश्रमाच्या संस्थापिका जयश्री बुचडेआणि दीपक बुचडे यांच्या १९ वर्षांच्या अविरत सेवेला या युवकांनी मनापासून सलाम केला.या अनोख्या होळी उत्सवात सहभागी झाल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला.