आश्रमशाळेस संगणक प्रदान

मलकापूर (वार्ताहर) : शाहूवाडी येथील शामराव शिवाजी दाभाडे अनुसूचित जमाती भटक्या विमुक्त जाती संचलित केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक निवासी अनिवासी आश्रमशाळेस प्रकाश पाटील-आरुळकर वांच्याकडून संगणक प्रदान करण्यात आले.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक बाजीराव वारंग यांनी केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाबासो मिसाळ होते. प्रकाश पाटील म्हणाले,शाहूवाडीसारख्या दुर्गम भागात स्वत:च्या सेवानिवृत्तीतून मिळणाऱ्या रकमेतून आश्रमशाळा चालनण्याचा उपक्रम स्तुत्य असून अशा शाळांना समाजाने संडळ हाताने मदत करणे गरजेचे आहे. याप्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख यशवंत पाहील, दशरथ पाटील, सचिव डी. एम. बुडे यांनी मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमास शिवसेना तालुकाप्रमुख दत्ता पवार, धौडिराम सोने, पांडुरंग पाटील आधी उपस्थित होते. एस. बी. पाटीता मांनी आभार मानले.