लहानपणापासूनच प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत, मी मेहनतीने स्वतःला घडवलं. महसूल खात्यात शिपाई म्हणून सुरुवात करून तलाठी, पुरवठा निरीक्षक अशा पदांवर ३४ वर्ष सेवा केली. नोकरीदरम्यान गावोगावी उपक्रम राबवत, अधिकारी न बनता लोकसेवक म्हणून काम केलं. ग्रामीण समस्या जवळून पाहिल्या आणि प्रत्येक गावाशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण केलं.
सामाजिक बांधिलकीतून २००६ साली अनाथ, निराधार व वंचित मुलांसाठी शिक्षणरूपी आश्रय उभा केला. इथे १ ली ते १० वी पर्यंत मोफत शिक्षण दिलं जातं. ही आश्रमशाळा कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय, समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या मदतीतून चालवली जाते. इथले विद्यार्थी अतिशय हालाखीच्या परिस्थितीतून आलेले आहेत—काहींना आई-वडील नाहीत, काहींचे पालक व्यसनी, काही निराधार.
या चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी समाजाची मदत ही अमूल्य आहे. शैक्षणिक साहित्य, अन्नधान्य, आणि आर्थिक सहकार्याच्या माध्यमातून आपणही या ज्ञानयज्ञात सहभागी व्हा. धन्यवाद!
संचालकाचे मनोगत
(दिपक बुचडे) मनोगत
संचालकाचे मनोगत
प्रभारी अध्यक्षा
(जयश्री दिपक बुचडे) मनोगत
समर्पणातून सेवा गेल्या १९ वर्षांपासून मी या संस्थेची सेवा करत आहे. पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत अखंडपणे कार्यरत असतो. शासकीय सेवेत अधिकारी पदावर कार्य केल्यानंतर २०१९ मध्ये वडिलांचे अचानक निधन झाले, आणि संस्थेला बंद करण्याचा विचार मनात आला. कारण, निवृत्तीनंतर ८०% निधी व ५०% पेन्शन या संस्थेसाठी वापरत होतो, आणि आधारविना कार्य अशक्य वाटले.
मात्र, सन्माननीय बाबुराव सागावकर, उल्हास गांधी, सुबोध भिंगारडे, रजिश शिशोदे, इब्राहिम उंबर्डेकर, बी.एस. पाटील, नामदेव पाटील यांच्या प्रेरणेमुळे संस्था पुन्हा सुरू करण्याचा धीर आला.
अनेक अडचणींचा सामना करत मुलांना तीन वेळचं जेवण, अंघोळीसाठी गरम पाणी, चहा, फळं आदींची व्यवस्था केली जाते. या कार्यात पती दीपक बुचडे यांची साथ आणि मुलं जगदीश व सानवी यांचे भजनाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न उपयोगी येत आहे. “भजन आहे तर भोजन आहे” हे आमचं सत्य बनलं आहे.
हे कार्य केवळ समर्पणातून शक्य आहे. वडिलांची प्रेरणा आम्ही, तीन बहिणी – वनिता, सुजाता आणि मी – पुढे नेत आहोत. समाजातील दातृत्वाने या सेवाकार्यात मदतीचा हात द्यावा, हीच नम्र विनंती.
“समर्पण हीच खरी भक्ती आहे” – सद्गुरु हरदेवजी महाराज
आमचा दृष्टिकोन आणि ध्येय
वंचित, अनाथ आणि गरजू बालकांना शिक्षण, सुरक्षा आणि संधी देऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल करणे.
शिक्षण आणि संरक्षणाच्या माध्यमातून त्यांना आत्मनिर्भर आणि सशक्त बनवणे. समाजातील सहृदय व्यक्ती व संस्थांच्या सहकार्याने शैक्षणिक आणि विकासात्मक उपक्रम राबवणे.
प्रत्येक बालकाला शिक्षणाचा आणि सुरक्षित आयुष्याचा हक्क मिळवून देणे.
मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणे.
अनाथ व उपेक्षित बालकांना सुरक्षित आश्रय देणे.
त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा आणि प्रशिक्षण देणे
समाजाच्या सहकार्याने गरजू मुलांचे जीवन समृद्ध करणे.
अनमोल सहकार्य
मा. श्री. बाबुराव दत्तात्रय सागावकर साहेब (संस्थापक - प्रणित ग्रुप ऑफ कं, अध्यक्ष -लायन्स क्लब ऑफ आकुर्डी )
मा. श्री.संगीता बाबुराव सागावकर ( संचालिका - प्रणित ग्रुप ऑफ कंपनी )