शा. शि. दाभाडे. अनु. जा. ज भ. विमुक्त शिक्षण संस्था संचलित देवघर सेवा धाम आश्रम शाळा,शाहूवाडी.

Personal Info

Terms

Donation Total: ₹100.00

अंधारातून प्रकाशाकडे : ज्ञानरूपी ज्योत पेटवू, भविष्य उजळवू!

देवघर सेवाधाम संस्थेची स्थापना:

 शाहूवाडी तालुक्यातील चनवाड येथे देवघर सेवाधाम आश्रम शाळा आहे. या संस्थेची स्थापना एका निवृत्त सेवापुरवठा अधिकारी कै. बाबासो मिसाळ यांनी सन २००६ मध्ये केली. त्यांच्या पश्चात या संस्थेचा सर्व कारभार त्यांची कन्या सौ. जयश्री बुचडे व जावई दीपक बुचडे हे सांभाळत आहेत. ही सेवा संस्था वंचित, अनाथ, निराधार मुलांची आधारवड आहे. या संस्थेच्या संस्थापिका जयश्रीताई आहेत. देवघरमध्ये ७ ते १३ वयोगटातील ४२ हून अधिक मुले व मुली आहेत. ही मुले अनाथ, वंचित घटकातील असून, कुणाला आई तर कुणाला बाप नाही, तर काही अनाथ आहेत, अशी विदारक परिस्थितीतील आहेत.

आश्रम शाळेची वैशिष्ट्ये:

मोफत
निवास

गुणवत्ता
शिक्षण

पौष्टीक
आहार

आरोग्य
तपासणी

ग्रंथालयीन
अभ्यासिक

अनुभवी शिक्षक
स्टाफ

अनुदानाशिवाय चालतो गाडा:

 या सेवा संस्थेला शासनाचे कोणतेही अनुदान मिळत नाही. मुलांच्या शिक्षणाबरोबर खाण्या-पिण्याचे, आरोग्याचे हाल होऊ नयेत, म्हणून समाजातील दातृत्वाकडे पदर पसरून त्यांच्या जेवणाची, राहण्याची आणि शिक्षणाची दारे खुले करून स्वतः जेवण बनवून त्यांना सांभाळत आहेत. त्यांना त्यांचे पती दीपक बुचडे, मुलगा जगदिश, मुलगी सानिया सहकार्य करत आहेत. जगदीश उत्तम तबला वादक असून सानिया उत्तम गायिका आहे. त्यांच्या अभंगनाद कार्यक्रमातून तेही संस्थेतील मुलांसाठी मदत करत आहेत. त्या अनाथ मुलांच्या आई आहेत. गेली २००६ पासून अखंड त्यांची सेवा सुरू आहे.

समाजावर

आमच्या कार्याचा
ठसा

मुलांना मदत आणि आशा देणे

0

पासून कार्यरत

0 +

मुलांना लाभ

0 +

पुरस्कार मिळवले

चित्रफिती

देवघर सेवाधाम एनजीओ संस्थेत आपले स्वागत आहे, जी गरिब मुलांना मदत करते.

|| आपल्या मदतीचा एक हात, गरजू मुलांना मिळेल आयुष्याची साथ! ||

मान्यवरांचे मनोगत